डॉ. हरिदास यांची मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती

डॉ. हरिदास यांची मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती

उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना काळात सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय यंत्रणेने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामध्ये डॉक्टर सतीश हरिदास यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ. सतीश हरदास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीची वार्ता समजताच त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. संजय पवार, डॉ. कापसे, डॉ आनंद कांबळे, डॉ. संतोष हिंडोळे, डॉ. अभय कदम, डॉ. भंडारे, डॉ. प्रशांत माळी, लातूरचे विक्रम गोजमगुंडे, रवींद्र भालेराव, लक्ष्मीकांत मुळे इत्यादी मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मंत्रालयामध्ये आरोग्य विभागाच्या बाबतीत डॉ. सतीश हरिदास हे आपल्या उत्कृष्ट कार्य शैलीने लातूर जिल्ह्यातील गौरवशाली परंपरेचे नावलौकिक करतील, अशा अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या.

About The Author