कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल महाविकास आघाडीचा जल्लोष

कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल महाविकास आघाडीचा जल्लोष

उदगीर (एल.पी.उगीले) : कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाला भरभरून यश आले असून काँग्रेसच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे उदगीर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने शिवाजी चौक येथे आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला गेला. याप्रसंगी काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष कल्याण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 2024 सालातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील असाच निकाल महाराष्ट्रात देखील पाहायला मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, माजी उपनगराध्यक्ष फैजू खा पठाण, राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार चवळे, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील मानकीकर, यांच्यासह शिवाजी देवनाळे, शफी हाश्मी, बालाजी पाटील, जीवन पाटील, संतोष बिरादार, माधव कांबळे, पद्माकर उगिले, विवेक पंडितराव जाधव, समीर शेख, मोहन पाटील, मनोज गायकवाड, संतोष वळसणे, महबूब शेख, राजकुमार भालेराव, संदीप पाटील, महेश भंडे, केशव सूर्यवंशी, राजकुमार चव्हाण, हुसेन शेख नेत्रगावकर, गणपत कुंडगीर, इब्राहिम नाना, भीमराव श्रीमंगले, सय्यद इरफान, आरिफ मिरदे, चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे, मंगेश हेरकर, विष्णू चिंतलवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!