तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण माघार
उदगीर (प्रतिनिधी) : हैबतपुर येथील शेतकरी धोंडीराम तेलंगपुरे व गिरीधर तेलंगपुरे दोघेही शेतातील शेत रस्त्या आडवणूक केल्याप्रकरणी रस्ता खुल्ला करून देण्यात यावा, ही मागणी उदगीरचे तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी करून सुद्धा त्यावरील आडवाडीचा प्रकार थांबत नव्हता, सदर प्रकरणी कंटाळून तेलंगपुरे परिवाराने संबंधित अधिकाऱ्याला माहिती देऊन उपोषणास बसले होते. संबंधित शेतकऱ्याकडे उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळे ते शेवटचे हत्यार उपसून उदगीर तहसील समोर उपोषण करत होते. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे व त्यांचे सहकारी अनुक्रमे अमोल निडवदे, बालाजी गवारे, शेषराव ढगे, चंद्रकांत भातमोडे उपोषण स्थळी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे या विषयावर चर्चा करून रस्ता खुला करून देण्यासंबंधी उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी आश्वासन देऊ आपण स्वतः जागेवर उपस्थित नव्हते, तरीही त्यांनी पेशकार यांना उपोषण स्थळी पाठवून अधिकृतपणे लेखी आश्वासन देऊन हे प्रकरण दोन महिन्याच्या आत निकाली काढून न्याय देण्याची व्यवस्था करू, रस्त्याचे आडवणूक होणार नाही. या संबंधी योग्य ती कारवाई करू. असे आश्वासन दिल्यानंतर संबंधित तेलंगपुरे परिवारास सविस्तर समजावून सांगून व अधिकाऱ्याला आश्वासन पूर्ण करण्यासाठी आश्वस्त करून हे उपोषण संपवण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनीही लेखी आश्वासन दिले.