बाबूराव रेड्डी शेळके यांचा जन्म शताब्दी निमित्त सत्कार.
उदगीर (प्रतिनिधी ) : उदगीर तालुक्यातील टाकळीचे प्रख्यात शेतकरी, सामाजिक व राजकीय नेते बाबूराव रेड्डी विरप्पा शेळके यांनी जीवनाचे शतक पूर्ण केल्याबद्दल,त्यांची जन्मशताब्दी जीव्हाळा ग्रुपने देविदासराव नादरगे यांच्या अध्यक्षते खाली साजरी केली.
शतक पार करून जगत असलेले बाबूराव रेड्डी शेळके यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरूजी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक (भारतबाई शेळके)शाल, पुष्पहार देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पांडुरंग बोडके, लक्ष्मीकांत बिडवइ , अशोकराव हाळे,सचिन बापुरे इ.मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शेळके सत्कार समयी मुडपे गुरुजी म्हणाले की,१९७२ पर्यंत शेळके परिवार गोपालक शेतकरी म्हणून प्रसिध्द होते.बाबूरेड्डीयांच्याकडे १०० ते १५० गायी होत्या.दूधगंड नावाने प्रसिद्ध असलेल्या कुराणातील गवत खाऊन गायी म्हशी भरपूर दूध द्यायच्या.७२च्या दुष्काळ नंतर लोकांना
म्हशी पालन करुन दूध उत्पादन वाढविण्या साठी बाबूरेड्डीनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.शेळके परिवाराच्या दूध उत्पादन व्यवसायामुळे टाकळीची डेअरी प्रथम राहिली.
बाबूराव रेड्डी शतकोत्तर कृतज्ञता सोहळ्यात
अशोक हाळे, लक्ष्मीकांत बिडवइ यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग बोडके यांनी केले तर शिवकुमार रेड्डी शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन बापुरेनी परिश्रम घेतले.