छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्य शिव व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रीय तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा स्वावलंबी होणे गरजेचे आहे असे विचार शिवव्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे हे हे व्याख्यान देत असताना पुढे म्हणाले की, भारत देश ही खूप मोठी बाजारपेठ आहे. तिचा फायदा करून घ्यावा. विदेशी कंपन्या भारतात येऊन मोठा व्यवसाय करतात, स्वतःचा व्यवसाय उभा करातात ,आपण का मागे आपणही त्यांच्या सारखे कार्य केले पाहिजे असे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे फक्त ढाल व तलवार हे न पाहता त्यांची दूरदृष्टी, बुद्धीच्यातुर्य, निडर बाणा, धाडसी वृत्ती, व्यापारी दृष्टिकोन, आत्मनिर्भरता, आधुनिक दृष्टिकोन कसा होता या संदर्भात सविस्तर सांगितले.तसेच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसारखे चिकित्सक वृत्ती बाळगा असे सांगितले. हो ला हो म्हणू नका ,खरे काय तेच बोला, असे त्यांनी सांगितले.
तसेच महिलांचा सन्मान करा, महिलांना सुरक्षितता द्या. महिला शिकल्या म्हणजे समाज शिकेल, महिलांनी भावी नागरिक घडवण्या साठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही सांगितले.
तसेच पालकांनी मुलांना मर्यादित विचार न ठेवता जागतिक स्तरावरील अभ्यास केला पाहिजे, याही बाबी सांगितल्या. प्रा. गणेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी विविध पैलूंचे दर्शन घडविले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी हजारोच्या संख्येने नवयुवक तरुण, युवक सुद्धा उपस्थित होते.