तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची दमदार कामगिरी ; अहमदपूरात ५० ते ५५ ब्रास वाळूसाठा जप्त

तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची दमदार कामगिरी ; अहमदपूरात ५० ते ५५ ब्रास वाळूसाठा जप्त

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील लातुर नांदेडच्या सिमेवरील भागात असलेल्या राळगा या गावी एका शेतकऱ्याच्या शेतात गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या पात्रातुन वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा साठवण केला असल्याची माहिती दि(१२ मे ) रोजी दुपारी तहसीलदार यांना मिळाली असता त्यानंतर त्यांनी उप- जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी पथकासह सदरील ठिकाणाहुन ५० ते ५५ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त करून अहमदपूर येथे आणण्यात आला आहे.

तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची दमदार कामगिरी ; अहमदपूरात ५० ते ५५ ब्रास वाळूसाठा जप्त

याविषयी सविस्तर माहीती अशी की,अहमदपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैद्य मार्गाने गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रातुन उपसा केलेली वाळू लातुर- नांदेडच्या सिमावर्ती भागातील राळगा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात साठा करून तो रात्रीच्या वेळी टिप्परच्या साह्याने अहमदपूर शहरात विक्री केला जात असल्याची गुप्त माहीती खबऱ्यामार्फत दि १२ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना मिळाली असता उप- जिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी नागनाथ कवठे तलाठी महेश गुपिले तलाठी बिराजदार प्रशांत तलाठी संतोष खोमणे आदींच्या ताफ्यासह तहसीलदार यांनी मौजे राळगा येथील शेतकरी सखाराम नामदेव राठोड यांच्या मदतीने राम नामदेव राठोड रा राळगा ता अहमदपूर यांच्या शेतात गट क्र. १६३ व सुधीर गोरटे गट क्र. १६५ या गटामध्ये अंदाजे ५० ते ५५ ब्रास साठवुन ठेवलेला अवैध वाळु साठा जप्त करण्यात आला.

तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी रात्री उशीरापर्यंत तळ ठोकुन त्या अवैध वाळूचा पंचनामा केला. कारवाई केलेली ५० ते ५५ ब्रास वाळू चोरीला जाण्याची भीती असल्याने ही वाळू अहमदपूरला हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शुक्रवारी दि १२ मे रोजी रात्री उशीरापर्यंत टिप्परद्वारे हा वाळू साठा अहमदपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आणण्यात आला आहे.

त्यामुळे या संस्थेत जिकडे तिकडे वाळूचे ढीग पाहायला मिळत आहेत. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियात धडकी बसली आहे.

मंडळ अधिकारी विशाल केंचे , तलाठी माधव जोशी, तलाठी नवनीत जामनिक, तलाठी दिंगाबर मेंडके , शिपाई सिद्धार्थ कांबळे , शिपाई आकाश कंधारकर , कोतवाल गोपाळ कासले, हेकॉ. गाडे हेकॉ. आरदवाड आदींनी वाळू साठा जप्तीसाठी सहकार्य केले

About The Author