आगामी काळात बी.आर.एस.पक्ष प्रत्येक निवडणूक लढविणार – देवानंद मुळे
अहमदपूर ( गोविंद काळे ) : दि.१८ मे रोजी भारत राष्ट्र समिती ( बी.आर.एस.) पक्षाच्या वतिने विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत पक्षात नुकताच प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवानंद मुळे, वसंततात्या शेकटार, सुशिल घोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.या परिषदेत तेलंगना राज्याचा अवघ्या ७ वर्षात झालेला विकास व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची महाराष्ट्रात पसरत असलेली पक्ष सदस्यता यावर माहिती देण्यात आली.
बी.आर.एस पक्षाचे महाराष्ट्रचे नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्ग दर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगनाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांच्या निवासस्थानी लातूर जिल्हातून अहमदपूर चे माजी जिल्हापरिषद सदस्य देवानंद मुळे, जेष्ढ नेते वसंततात्या शेटकर, युवक नेते सुशिल घोटे यांनी नुकताच पक्ष प्रवेश केला असल्याची माहिती देवानंद यांनी परिषदेत दिली.
पुढे बोलताना देवानंद म्हणाले की, तेलंगना स्वतंत्र राज्य होण्यापुर्वी राज्या अकाल होता लाईट,पिण्याचे पाणी, शेतीस पाणी व माणवी हाताला काम सुद्धा नसल्यामुळे राज्यातील ३५ % पेक्षा जास्त लोकांनी राज्यातुन जिवंत राहण्यासाठी कामाच्या शोधात राज्य सोडुन दिले होते. राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सर्व प्रथम चंद्रशेखरराव यांची सरकार आल्यानंतर अवघ्या सात वर्षातच राज्यात आय.टी.सारखे भले मोठे अद्योग तर आलेच पण विना परतावा व्यापारासाठी कोट्यावधी रुपये सरकारकडुन नागरिकांना देण्यात आले शेतकऱ्यांना विज व पाणी मोफत पुरवीण्यात आले आज तेलंगना राज्यात १०० % शेती सिंचनात आहे.
ज्या राज्याल शहरात पुर्णतः लाईटची व्यवस्था उपलब्ध नव्हती आता शेतीसाठी २४ तास पाणी व २४ तास लाईट तेही मोफत देण्यात येते तसेच पेरणी साठी एकरी १० हजार रुपये सरकार कडुन देण्यात येते तसेच शेतकऱ्यांच्या म्रत्यु अपघाती असो वा नैसर्गिक म्रत्यु नंतर लागलीच ७ दिवसाच्या आत ५ लक्ष रुपये घरपोच चेकद्वारे दिले जाते.शेतकऱ्यांच्या मालाची सरकारद्वारे च खरेदी करण्यात येते या करिता ७ हजार खरेदी केंद्रे अभारण्यात आली आहेत.
कल्यान लक्ष्मी व शादी मुबारक योजनेच्या माध्यमातून मुलिच्या लग्नासाठी १ लाख १०० रुपये विना परताना देण्यात येते तसेज जेष्ठ नागरिक व एकट्या स्त्रियांना दर महिना २०१६ रुपये व दिव्यांगांना ३०१६ रुपये पेन्शन देण्यात येते.गरिब व गरजु लोकांना १००% अनुदानावर २ बेडरूम व १ किचन असे बांधुन घर देण्यात येते.दलित बंधु यांना उद्योग करण्यासाठी एका कुटुंबाला विना परतफेड १० लक्ष रुपये दिले जाते तर धनगर बंधु यांना पाळण्यासाठी मोफत मेंढ्या सरकार कडुन वाटप करण्यात येते.
गरोधर मातांना तपासणीसाठी रुग्णवाहीकेने घरातुन रुग्णालयात व परत नेऊन सोडण्यात येते येवढेच नव्हे तर बाळ जन्माला आल्यास १२ हजार रुपये व मुलगी जन्मल्यास १३ हजार रूपये संगोपनासाठी देण्यात येते.
यांसारख्या शेकडो योजना पक्षाच्या माध्यमातून तेलंगनात राबविण्यात येत असुन दुष्काळग्रस्त भाग असलेल्या राज्यात अवघ्या ७ वर्षात के.चंद्रशेखरराव यांनी हे करुन दाखविले असुन आता हे सर्व महाराष्ट्रात ही पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आसुन लातूर सह अहमदपूर-चाकुर मतदार संघात येणाऱ्या काळात येणारी प्रत्येक निवडणूक पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येणार असुन युवकांना सर्वात जास्त उमेदवारी देण्यात येणार असल्याचे मत देवानंद मुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले