मोळवण धाकटे येथे भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा तथा किर्तन महोत्सव

मोळवण धाकटे येथे भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा तथा किर्तन महोत्सव

किनगांव ( गोविंद काळे ) : मोळवण धाकटे येथील श्री, ह,भ,प,भागवताचार्य, किर्तनकेशरी, दिलीप महाराज मुसळे यांच्या पारमार्थिक सेवेचा रौप्य महोत्सव तथा त्यांच्याच संकल्पनेतुन साकार होत असलेला वैष्णव सदन या आश्रमाच्या भुमिपुजन सोहळ्यानिमित्त श्रीमद् भागवत कथा,गाथा पारायण तथा किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांची किर्तने होणार आहेत दि20मे2023 ते27मे2023 या कालावधीत कथा प्रवक्ते, श्री, ह,भ,प,भागवताचार्य, दिलीप महाराज मुसळे यांच्या रसाळ वाणीतून कथा संप्पन्न होणार आहे.

दि20 मे रोजी श्री ह भ प विनोदाचार्य, विलास महाराज गेजगे दि21 मे रोजी ह भ प प्रभाकर महाराज झोलकर दि22 मे रोजी ह भ प विद्वतप्रचुर केशव महाराज घुले टाकळी केज दि 23 मे रोजी ह भ प विनोदमुर्ती,मधुकर महाराज सायाळकर दि24 मे रोजी वारकरी भुषण,ज्ञानोबा माउली मुडेकर दि25 मे रोजी आचार्य, अर्जुन महाराज लाड होळ दि26 मे रोजी विनोदाचा बादशहा, प्रकाश महाराज साठे धारुरकर दि 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आश्रमाचा भुमिपुजन सोहळा होईल,व दुपारी 12ते2 या वेळेत श्री ह भ प,किर्तनकेशरी, दिलीप महाराज मुसळे मोळवणकर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे निमंत्रण उत्सव समिती, मित्रपरिवार, भक्तपरिवार,ग्रामस्थ मंडळी मोळवण धाकटे यांनी केले आहे या कार्यक्रमास,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांप्रदायिक व सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित रहाणार आहे

About The Author