परचंडा अंगणवाडीस आयएसओ नामांकन प्राप्त

परचंडा अंगणवाडीस आयएसओ नामांकन प्राप्त

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील परचंडा गाव स्मार्ट व्हिलेज मध्ये पहिला येण्याचा मान मिळवल्यानंतर परचंडा अंगणवाडीला आयएसओ नामांकन मिळवून गावच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डिजिटल जमान्यांमध्ये ही अंगणवाडी डिजिटल बरोबरच आयएसओ नामांकन प्राप्त झाली आहे अहमदपूर तालुक्यातील परचंडा अंगणवाडी ने एक पाऊल पुढे टाकत प्रथमतः स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होण्याचा मान मिळवला त्यानंतर सर्वच बाबतीत गुणवत्ता दर्जा प्राप्त करून आयएसओ नामांकन प्राप्त केली आहे.

सोलार सिस्टिम वर सर्व अंगणवाडी चालणारी तालुक्यातील पहिली व एकमेव अंगणवाडी म्हणून नावारूपास आली आहे. यामुळे वार्षिक लाईट बिल वाचले आहे. परचंडा अंगणवाड्याचे रूप आता पूर्णता बदलले आहेे शैक्षणिक गुणवत्ते सोबतच अनेक प्रकारच्या भौतिक सुविधा पण उपलब्ध झाल्या आहेत वृक्ष लागवड, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सोलार वर सर्व इमारतीला वीजपुरवठा, व्यासपीठ, लॉन, बेसिन ,स्वच्छता अशा अनेक सुविधानी अंगणवाड्या नटलेल्या दिसत आहेत.

मागील काळात एक दोन वेळेस गटविकास अधिकारी श्री अमोल कुमार आन्देलवार साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आनंद व्यक्त केला आहे.

स्मार्ट डिजिटल अंगणवाडीमुळे मुलांचा ओढही वाढला आहे. विद्यार्थ्यांना आय कार्ड, मुलांना बसायला टेबल खुर्च्या, गणवेश, सोलार वर टीव्ही, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, कार्पेट, राष्ट्रपुरुषांचे फोटो, कार्टून, बालोद्यान इत्यादी बाबीचे निरीक्षण करून आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे.

यासाठी आदर्श सरपंच सौ शिवनंदा राजेंद्र हिप्परगे, अंगणवाडी सेविका राशीद भाई शेख, सूर्यमाला जाधव मदतनीस काशीबाई कदम, रंजना वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे थोड्याच दिवसांमध्ये विधीवत प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे.

परचंडा अंगणवाड्यात कधीच निधी कमी पडू दिला जाणार दिला नाही. अंगणवाडी कडे विशेष लक्ष देतो अजून भरपूर काम करायचे आहे.

सरपंच – सौ शिवनंदा राजेंद्र हिप्परगे ग्रामपंचायत कार्यालय परचंडा

शैक्षणिक गुणवत्तेवर जास्तीत जास्त भर देत आहोत स्मार्ट डिजिटल अंगणवाडी बनवल्यामुळे पट ही वाढला आहे लोक सहभागामुळे व ग्रामपंचायतने विशेष लक्ष दिल्यामुळे अंगणवाडीचा कायापालट झाला आहे.

राशीदबाई शेख
अंगणवाडी मदतनीस

About The Author