गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदीपात्रातील गाळ काढणे फायद्याचे – आमदार बाबासाहेब पाटील

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदीपात्रातील गाळ काढणे फायद्याचे - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजने अंतर्गत प्रकल्पावरील व नदीपात्रातील गाळ काढणे संदर्भात तहसील कार्यालयात आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असता धरणातील गाळ काढल्यानंतर पाणीसाठ्यात भरमसाठ वाढ होणार असून ती गाळ शेतीत टाकल्यामुळे जमीन नंबर एकची सुपीक होउन उत्पादन वाढणार असल्याचे यावेळी सांगितले.

तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत तहसीलदार बबीता आळंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अहमदपूर तालुक्यातील विविध गावा गावातील तलाव व त्यामध्ये असलेले अंदाजे गाळाचे परिणाम घनमीटर मध्ये आहे.

कोपरा साठवण (१० हजार), उगीलेवाडी साठवण (१० हजार), पाटोदा साठवण (८हजार), गोताळा साठवण (१२ हजार), अहमदपूर साठवण (१२ हजार), तेलगाव लघु पाझर ( १५हजार), काळेगाव साठवण (१५ हजार), मोघा लघु पाझर ( एक लाख ७१ हजार), थोडगा लघु पाझर (८७ हजार), सावरगाव थोट साठवण (७५ हजार), तांबट सांगवी साठवण (एक लाख १७ हजार), मावलगाव साठवण (१६ हजार ६५०), खंडाळी साठवण (९हजार नऊशे), हागदळ- गुगदळ साठवण (१३हजार ५००), नागझरी साठवण (९ हजार ९00), सोनखेड लघु पाझर (१९ हजार ५००), धसवाडी लघु पाझर (४८ हजार), अंधोरी साठवन (८ हजार १००), ढाळेगाव साठवण (१४ हजार ४००),येस्तार साठवण (१९हजार २००), मोळवण साठवण ( ६ हजार ३००), कावळवाडी साठवण (१८ हजार नऊशे ), हंगेवाडी साठवण (20 हजार १००), येलदरवाडी साठवण (६ हजार तीनशे) असे आहे.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले तळ्यातील गाळ आपल्या शेत शिवारात टाकला तर जमीन सुपीक होण्यास मदत होईल परिणामी आर्थिक उत्पन्न वाढेल तसेच संबंधित तलावातील पाणीसाठा वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. आपल्या शेती परिसरातील वाढलेला पाणीसाठा व आपल्या शेत शिवारात टाकलेल्या गाळामुळे आपल्या शेतीमधील उत्पन्नात भर पडेल.व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.आणी जिवन सुखी होणार आहे. या योजनेत असलेल्या अपेक्षित शेतकऱ्यांनी या गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हानही यावेळी आमदार पाटील यांनी केले. बैठकीस संबंधित गावातील तलाठी,मंडळ अधिकारी , ग्रामसेवक व सरपंच यांची उपस्थिती होती.

About The Author