नागराळ ते आरसनाळ या वादग्रस गावठाण रस्त्याने घेतला मोकळा श्वास, मंडळाधिकारी अनिता ढगे यांच्या प्रयत्नाला यश.
देवणी (प्रतिनिधी) : देवणी शेतात पिकविलेले धान्य सरळ बाजार पेठेत घेऊन जाता यावे ,भाऊ बंधकीतील आपसातील वाद आपसात मिटावे ,हे वाद न्यायप्रविष्ट होऊन वेळ व पैसा वाया जाऊ नये, असा उदात्य हेतू ठेवून जिल्ह्यातील सर्व रस्ते 1 मे 2023 पर्यंत अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. त्याच अनुशंगाने देवणी तालुक्यातील सध्या नकाशावर असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून देवणी तालुक्यातील नागराळ येथील नकाशावर असलेला वर्षेनुवर्षे वादग्रस्त असलेला नागराळ ते आरसनाळ यांना जोडणारा सव्वा आठ फुटाचा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यास देवणीच्या मंडळाधिकारी श्रीमती अनिता ढगे यांना यश मिळाले आहे .देवणी तालुक्यातील नागराळ येथील काही शेतकऱ्यांच्या शेती उदगीर तालुक्यातील आरसनाळ गावात आहेत, तर काही आरसनाळ येथील शेतकऱ्यांच्या शेती नागराळ गावात आहेत, एकमेकांच्या शेताला जाण्यास नकाशात वहिवाट रस्ते असूनही आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडविला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन देवणीच्या कर्तव्यदक्ष मंडळाधिकारीअनिता ढगे यांनी संबंधित शेतकरी यांना जायमोक्यावर बोलावून सदर शेतकऱ्यांना सामंजस्यपणे समजावून सांगून एकमेकांचे गैरसमज दूर करून, वर्षांनुवर्ष वादग्रस्त असलेला रस्ता अखेर ढगे मॅडम यांनी खुला करून दिला. याच रस्त्यांना मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत हे रस्ते बारमाही वापरता यावे, म्हणून यांची पक्की बांधणी करण्यात येणार आहे. या रस्त्याना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेता यावा. म्हणून ही योजना मनरेगा अंतर्गत चालू आहे.
हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कोनाळी सज्जाच्या तलाठी अनिता निंगुळे, नागराळचे सरपंच विष्णू ऐनिले, दिलीप पाटील, मदार शेख, शेतकरी राम चामले, अरविंद चामले,सचिन चामले,शिवराज तेलंगे, माधव मोतीरावे, रघुनाथ मोतीरावे ,नामदेव मोतीरावे इत्यादी शेतकरी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे मंडळाधिकारी अनिता व तलाठी अनिता या दोन्ही अनिताचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.