भिमशाहिर प्रमोद लोखंडे व मनोज संसारे यांना अभिवादन
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील आंबेडकरी चळवळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी जीवाची परवा न करता. अहो रात्र कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन सातत्याने करणारे प्रमोद लोखंडे नागठाण्याचे भूमिपुत्र छोट्याशा गावातील जन्मास आलेले प्रमोद लोखंडे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपला अंतिम स्वप्न या अल्बमच्या माध्यमातून लाखाच्यावर चाहता वर्ग निर्माण केला होता. नुकतेच भीम शाहीर प्रमोद लोखंडे व मुंबई येथील दलित पॅंथर चे नेते मनोज संसारे यांचे निधन झाल्यामुळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन सभा आयोजित करण्यात आले होते यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कांबळे. सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ कांबळे. राष्ट्रवादीचे गोपीनाथजी जोंधळे. विद्रोही कवी राजेंद्र कांबळे. प्रा बालाजी आचार्य. माजी मुख्याध्यापक शेषराव ससाने रिपाईचे नेते अरुणभाऊ वाघम्बर. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मेघराज गायकवाड. प्रकाश ससाने. भगवान ससाने. विनय ढवळे. पत्रकार शिवाजी गायकवाड. पत्रकार त्रिशरण मोहगावकर. दिनकर मदेवाड. डॉ संजय वाघम्बर. समाधान कांबळे यावेळी अभिवादन केले . श्रीकांत भाऊ बनसोडे यांनी अभिवादन सभा आयोजित केली होती. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते