ग्रामपंचायतीचे ऑनलाईन अर्ज आता ऑफलाईन स्वीकारणार – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतीनिधी) : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील संगणक केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरून ऑफलाईन प्रिंट तहसिलला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.व हे अर्ज सादर करण्यासाठी दुपारी 3 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी अर्ज भरताना इंटरनेटची समस्या उद्भवत आहे. त्यातच वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महाराष्ट्र शासन निवडणूक विभागाचे आयुक्त मदान व सचिव कुरूंदकर यांच्याशी चर्चा केली असता. त्यांनी ग्रामपचांयत उमेदवाराचे अर्ज भरण्याची वेळ 5.30 पर्यंत वाढवून दिलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्जा ऐवजी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश संबंधीत जिल्हाधिकार्यांना दिले असल्याची माहिती माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
सध्या जिल्हाभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्यात आले असतानाही ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी गावपुढार्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील कुठल्याही संगणक केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरून तोच अर्ज ऑफलाईन तहसिलकडे सादर करण्याची प्रकिया सुरू आहे, पंरतु सगळीकडे ऑनलाईन अर्ज भरणे आणि त्या अर्जाची हार्ड कॉपी वेळेत दाखल करण्यासाठी एकच धावपळ सुरू असल्याची दिसून येत आहे. त्यातच हे अर्ज भरताना इंटरनेटची समस्या उद्भवत असल्यामुळे दिवसभरात एकही अर्ज भरणे शक्य होत नाही. ही सर्वच गावातील अडचण लक्षात घेवून भाजपा नेते तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महाराष्ट्र शासनाचे निवडणूक विभागाचे आयुक्त मदान व सचिव कुरूंदकर यांच्याशी चर्चा केली असता. त्यांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अडचणी लक्षात घेवून ग्रामपंचायत उमेदवाराचे अर्ज ऑफलाईन सादर करण्याची परवानगी दिली आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ 5.30 पर्यंत करू याबाबत सबंधीत जिल्हाधिाकर्यांना आदेश देवून ग्रामस्थरावरील अडचणी दूर करण्याचा विश्वास भाजपा नेते तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याशी बोलताना दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागातील पुढार्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.