लायनेस क्‍लब लातूर तर्फे यशस्वी महिला उद्योजक मोहर कुंभार यांचा सत्कार

लायनेस क्‍लब लातूर तर्फे यशस्वी महिला उद्योजक मोहर कुंभार यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : लायनेस क्‍लब लातूरच्यावतीने गांजूर गावातील यशस्वी उद्योजिका मोहर कुंभार यांनी पर्यावरणपुर्वक उद्योग सुरू करून ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला. त्यामुळे लायनेस क्‍लब लातूरच्या डिस्ट्रीकच्या उपप्रांताध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्याहस्ते गांजूर येथील कार्यक्रमात त्यांच्या सत्कार करण्यात आला. लातूर लायनेस क्ल्बच्यावतीने लातूर तालुक्यातील गांजूर हे गाव दत्तक घेतले आहे. या क्‍लबच्या माध्यमातून व सहकार्यातून कापड पिशवी शिवण्याचा व्यवसाय महिला उद्योजक मोहर कुंभार यांन सुरू केला. या उद्योगामुळे त्यांची आर्थिक सक्षमता वाढली असून त्यांनी बनविलेल्या पिशव्यांनाही मार्केटमध्ये चांगली मागणी होऊ लागलेली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. पर्यावरणपूरक हा उद्योग असल्यामुळे तो उद्योग चालविणार्‍या मोहर कुंभार व या उद्योगामध्ये काम करणार्‍या महिलांचीही प्रतिष्ठा वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेवून लायनेस क्‍लब लातूरच्यावतीने लायनेस क्‍लबच्या डिस्ट्रीक उपप्रांताध्यक्षा तथा लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्याहस्ते त्यांचाही यशोचित सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.क्रांती मोरे-लाटकर, अ‍ॅड.रजणी गिरवलकर, संजिवनी कराड, सुनिता मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर लायनेस क्‍लबच्या सचिव तथा मल्टिपल कॅबिनेट ऑफीसर प्रा.संजयादेवी पवार-गोरे यांनी केले. यावेळी यशस्वी उद्योजिका मोहर कुंभार यांचा परिचय लातूर लायनेस क्‍लबच्या अध्यक्षा तथा गांजूरच्या सरपंच डॉ. कुसूूमताई मोरे यांनी करून दिला. शेवटी कार्यक्रमाचे आभार विद्याताई देशमुख यांनी मानले. यावेळी लातून लायनेस क्‍लबच्या पदाधिकारी व इतर महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

About The Author