गुटख्यावर छापा, ३४ लाख ८४ हजार रुपयाचा मुद्येमाल जप्त
पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या विशेष पथकाची कारवाई
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंदयाना आळा घालण्यासाठी विशेष मोहीमे अतर्गत विशेष पथकातील पोलीसांनी चाकुर हद्यीतील लातूर ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गोवा गुटखा घेवुन जाणा-या ट्रकला ताब्यात घेवुन सदर ट्रकमधील २४ लाख ८४ हजार रुपयाचा प्रतिबंधीत गोवा गुटख्यासह २ इसमाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, दि. २९ डिसेंबर रोजी चाकुर हादीतील लातुर ते नांदेड जाणाऱ्या महामार्गावर गुटखाचा ट्रक क्र. एम एच १२ के पी ५०१५ गुटखा घेवुन जात असल्याबाबत गुप्त माहीती मिळाल्यावरुन ०३.१५ वा सुमारास सुरेश वैजनाथ चव्हाण (वय ४०) रा. लंजवाड ता. भालकी जि. बिदर राज्य कर्नाटक, रऊफ रुकमोद्यीन ईनामदार (वय ३१) रा. केसर जवळगा ता. उमरगा जि.उस्मानाबाद हे लातुरकडुन नांदेडला जात असताना पोलीसांनी ट्रक थांबवुन सदर ट्रकची पाहणी केली असता ट्रक मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गोवा गुटखाच्या ३० मोठया बो-या प्रत्येक बोरी मध्ये सहा बॅग एक बॅग मध्ये ६० गोवा- १००० गुटखा पुडया एका पूडयाची किमंत २३० रुपये प्रमाणे एका बॅगची किमंत १३,८०० रुपये व एका बोरीची किंमत ८२,८०० रुपये या प्रमाणे ३० बोरी किमंत २४,८४,०० रुपये व ट्रक किमंत १०,००,००० रुपये असा एकुण ३४,८४,००० रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन सदर आरोपी विरुद्द पो स्टे चाकुर येथे गुरनं ४९२/२०२० कलम १८८,२७२,२७३,३२८,३४ भादवि सह कलम ५९ अन्र सुरक्षा कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चाकुर पोलीस करीत आहेत.