माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते कवी सातपुतेंच्या पुस्तकांचे प्रकाशन

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते कवी सातपुतेंच्या पुस्तकांचे प्रकाशन

लातूर (प्रतिनिधी) : येथील सुप्रसिद्ध कवी व वात्रटिकाकार भारत सातपुते यांनी संपादित केलेले आदरणीय विलासरावजीं देशमुख यांच्या आठवणींचे ‘मांजराकाठ’, प्रेम चारोळ्यांचे ‘चेहरा’ व राजकीय सामाजिक विसंगतीचे ‘आता बोंबला’ या वात्रटिकासंग्रहाचे प्रकाशन माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. वाड:मयाच्या विविध प्रकारात आजतागायत सातपुते यांची अडीच डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तक प्रकाशन प्रसंगी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महादेव खिचडे, डॉ. नागेश पाटील, रामदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!