६० वर्षीय महिलेवर बलात्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इंदिरा नगर भागातील ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने महिलेने वाकी नदीत उडी मारून आत्महत्या केली असुन आरोपी विरुद्ध गु.र.न. ४२२,२० कलम ३७६,३६६,३०६,३२३,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी किशन रेनुकादास उगाडे (वय ४०) रा. इंदिरा नगर अहमदपूर याने फिर्यादीची ६० वर्षीय सासु रा. इंदिरा नगर, अहमदपूर दि. २८ डिसेंबर वेळ २३.३० ते २९ डिसेंबर वेळ ११.३० वाजन्याच्या दरम्यान आरोपी किशन उगाडे याने जबरी बलात्कार केला व त्या वयोवृद्ध महिलेस मारहान करुन घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत वयोवृद्ध महिलेला हा प्रकार सहन न झाल्याने शहरा जवळील वाकी नदितील पाण्यात उडी मारून आपली जिवन यात्रा संपविली.
माणुसकीला काळीमा फासनार्या कृत्यामुळे प्रव्रत्त होऊनच महिलेने आत्महत्या केली असल्याच्या फिर्यादीच्या जबाबावरुन दि. २९ डिसेंबर वेळ १४.१६ वा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.नी.सुनिल बिर्ला हे करित आहेत.