खनिज वाळूमुळे बांधकाम खर्चात बचत

खनिज वाळूमुळे बांधकाम खर्चात बचत

जेएसडब्लू कंपनीची स्लॅग सँड आता लातुरात उपलब्ध

लातूर (प्रतिनिधी) : वाळूच्या तुटवड्यामुळे बांधकामाचे ओझे सामान्यांसाठी खूपच जड झाले आहे. खुली वाळू कोठूनही आणली तरी तिच्या दर्जाबाबत विक्री करणारे काहीच दावा करू शकत नाहीत. आता वाळूच्या दर्जाबाबत अधिकृत आणि केंद्र सरकारची मान्यता घेऊन बेल्लारी (कर्नाटक) येथील जेएसडब्लू कंपनीने खनिज वाळू बाजारात विक्रीसाठी आणली आहे. स्लॅग सँड नावाच्या वाळूमुळे बांधकाम खर्चात बचत होत असून घराचे स्वप्न पहाणाऱ्यांकडून या वाळूला पहिली पसंती दिली जात आहे. खुली व पन्नास किलोच्या पॅकींगमध्येही ही वाळू विक्रीसाठी लातुरात उपलब्ध झाली आहे. ही वाळू चाळण्याची (स्क्रिनींग) तसेच धुण्याची (वॉशिंग) गरज नाही. थेट बांधकामासाठी वापरता येते. नदीतील वाळूत चिकणमाती व गाळ असू शकतो. मात्र, ही वाळू चिकनमाती व गाळमुक्त आहे. वाळूत असलेला मोठा भरडा या स्लॅग सँडमध्ये थोडाही नाही. यामुळे मुठभरही वाळू वाया (वेस्टेज) जात नाही. गुणवत्तेच्या आयएस 383 च्या क्षेत्र दोनमधील मानांकनांचे यात तंतोतंत पालन केले जाते. आयएस निकषांनुसार काँक्रीट व प्लास्टरिंग कामांसाठीही वापरता येते. वाळूच्या गुणवैशिष्ट्यामुळे बांधकामात मजबूतता येते. गरजेनुसार ही वाळू पन्नास किलोच्या पॅकींगमध्येही उपलब्ध आहे. नदीपात्रातील वाळू आणि कृत्रिम वाळूच्या तुलनेत ही वाळू सरस ठरत असून बांधकाम करणाऱ्यांकडून वाळूला पहिली पसंती देण्यात येत आहे. गुळगुळीत पृष्ठांसह मजबूतता वाढवणारी रचना, वर्षभर उपलब्धता ही देखील या वाळूची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. नैसर्गिक संसाधनांची काळजी घेऊन मूल्यवर्धित केलेली वाळू असल्याने ती कायद्याच्या चौकटीतच आहे. या वाळूसाठी जेएसडब्लू कंपनीने लातूरमध्ये नवीन रेणापूर नाका, सिद्धेश्वर रोडवरील सेव्हन हिल्स अँड असोसिएटस् यांना अधिकृत विक्रेते म्हणून घोषित केले आहे. गरजूंनी वाळूसाठी संपर्क साधण्याचे आवाहन सेव्हन हिल्स अँड असोसिएटसचे संचालक रमेश वांगे (9096467453) यांनी केले आहे.

About The Author