महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात

महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात

महागाव (राम जाधव) : ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला “मिनी मंत्रालयाला” यात्रेचे स्वरूप आले असून या राजकीय आखाड्यातून नवनेतृत्व भवितव्य आजमावण्यासाठी तरुण पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना महामारी मुळे ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या निवडणुका केव्हा होतील याकडे ग्रामीण भागातील इच्छुकांचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायत निवडणूक तारीख जाहीर होताच तरुणांना आणि आजी-माजी नेत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून जो तो मी “निवडणूक” लढणार? असे गावातील इच्छुक तरुण बोलू लागले व आजी-माजी मी पुन्हा येईनच्या बट्ट्याबोल करू लागले. सध्याच्या परिस्थितीत गावात चौकात व सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीत कोण जिंकणार? कोणता वॉर्ड कोणास सरस ठरणार? याची जोरदार चर्चा होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस निवडणुकीतील राजकीय रंगत वाढत असल्याने गाव गाड्याची रणभूमी तापू लागलेली आहे. या निवडणुकीत तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. महागाव तालुक्यातील अंबोडा सवना पोहनडुळ धारमोह मुडाना हिवरा फुलसांगवी तिवरंग हे गाव साधारणत मोठी ग्रामपंचायत आहे तिवरंग ग्रामपंचायत येथील निवडणूक अनेक वेळा चुरशीची झाली असून या वेळेच्या निवडणुक लढत रंगतदार होणार का? ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाणार ?याकडे सर्वांचे लक्ष वेधले असून निवडणूक तोंडावर आल्याने गावात रात्री थंडी जोमाची असून सुद्धा उशिरापर्यंत निवडणुकीच्या बैठका होत असून उमेदवार निवडक पॅनल प्रमुखाची दमछम होतांना दिसून येत आहे. नवीन कायद्यानुसार गावाच्या विकासासाठी येणाऱ्या एकूण 70 टक्के निधी खर्च करण्याचा अधिकार सरपंचांना असून पूर्वी पेक्षा जादा निधी ग्रामपंचायतीला शासनाकडून वर्ग होणार असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा असली तरी गावातील पुढारी मात्र नवीन चेहर्‍यांना व मर्जीत राहणाऱ्यांना निवडणुकीत उतरवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्व ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची चुरस लागली यावेळी चे सरपंच पदाचे आरक्षण गुलदस्त्यात असल्याने गावातील राजकीय पुढारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून निवडणूक लढवणारे इच्छुक मात्र एकमेकांशी आदर भावा ने वागू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना या नवीन निवडणुकीत रस निर्माण झाला असून यावेळी च्या निवडणुकीतील उमेदवार हे मात्र प्रत्यक्ष निवडणूक फॉर्म भरल्यानंतर कळणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता तरी या गावाचे मोठ्या प्रमाणात विकास कोण करणार ?अशी चर्चा गावात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवार आपल्या नवीन वोटिंग बँकेकडे लक्ष वेधून आहेत.. त्यामुळे तरुणांनी दिग्गजांच्या विरोधात आपले पॅनल उभे केले आहे.

About The Author