सी.बी.एस.ई शिक्षणपध्दतीमुळे भारत महासत्ता बनेल – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

सी.बी.एस.ई शिक्षणपध्दतीमुळे भारत महासत्ता बनेल - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून 32 युनिट चालतात यामध्ये शाळा, कॉलेज, सी.बी.एस.ई. स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम केले जाते. यासाठी 800 कर्मचार्‍यांचा टिचींग व नॉनटिचींग कर्मचारी स्टाफ कार्यरत आहे. त्यामुळे या संस्थेचे अनेक विद्यार्थी अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर संशोधक या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श समोर ठेवून सध्याच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून यशस्वी वाटचाल करावी. सी.बी.एस.ई शिक्षणपध्दतीमुळे भारत महासत्ता बनेल,असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्यावतीने आयोजित पालक-विद्यार्थी मेळाव्यात बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य सचिदानंद जोशी, उपप्राचार्य सौ. आशा जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आपल्या देशाची लोकसंख्या जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वाधिक हुशार तरूण आपल्या देशात आहेत. तरीही सुशिक्षीत बेकारांचा संख्याही मोठी आहे. याचे कारण म्हणजे आपल्याकडील शिक्षण पध्दती त्यामुळे किमान कौशल्यावर आधारीत शिक्षणपध्दतीचा वापर करण्याचा गरज निर्माण झालेली आहे. केंद्र शासनाने नवीन सी.बी.एस.ई. शिक्षणपध्दती सुरू केली आहे. ती योग्य असून त्या शिक्षणपध्दतीला सपोर्ट करण्याचे काम आपण या संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत. संस्थेच्या ब्रिदवाक्यानुसार अध्यात्म, विज्ञान व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षणाद्वारे तेजस्वी विद्यार्थी निर्माण करावेत. अमेरिका, चीन, फ्रांन्स या देशांनी संशोधनाच्या आधारावर प्रगती करण्याचे काम केले. त्याच धर्तीवर आपणही वाटचाल करावी. कोरोणाच्या संकटाच्या काळात संशोधन करून ऑनलाईन शिक्षणाद्वारे आपण कोरोणाशी लढा देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे यापुढील काळातही विद्यार्थ्यांनी गाव, देश, जगाला काय पाहिजे? याचा अभ्यास करून आपली वाटचाल करावी, असे आवाहनही शेवटी बोलताना माजी आ.कव्हेकर यांनी केले.
प्रारंभी स्वामी विवेकांनदाच्या प्रतिमेचे पुजन माजी आ.कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल वैष्णवी भोरे, ऊर्जाबचत स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल रजित शर्मा व तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल नारायण राऊत यांचा ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा आढावा पी.पी.टी.प्रझेंटेशनच्या माध्यमातून नम्रता अंधारे मॅडम यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सचिदानंद जोशी यांनी केले तर सुत्रसंचलन उपप्राचार्य आशा जोशी यांनी केले तर आभार शिवकन्या मॅडम यांनी मानलेे. यावेळी उपप्राचार्य किरण देशपांडे, एच.आर.दिपाली चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author