तपसे चिंचोली येथे दत्त जयंती उत्साहात साजरी
औसा (प्रशांत नेटके) : तालुक्यातील तपसे चिंचोली येथील दत्त आश्रमात दत्त जयंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू सौ महानंदा माता यांच्या अनुष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण व भागवत गीता कथा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होते याकरिता तपसे चिंचोली गावातील भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.
श्रीमद भागवत सत्संग सोहळ्याकरिता महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची उपस्थिती होती. .भागवताचार्य गणेशानंद महाराज, गणेश महाराज, पांडुरंग महाराज, मुंजाजी महाराज, बालअवधूत दत्तात्रय महाराज यादव, महेश महाराज माकणीकर, पांडुरंग शास्त्री महाराज शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत गीता सत्संग सोहळा पार पडला.
दत्त जयंती यात्रा महोत्सव दि. 20 डिसेंबर ते 30 दरम्यान पार पडला दि 20 पासून महानंदा माताजीचा अनुष्ठान सोहळा व दि 23 पासून गुरुचरित्र पारायण व श्रीमद भागवत गीता सत्संग सोहळा दि. 30 तारखेपर्यंत पार पडला. दि. 30 रोजी पांडुरंग महाराज शास्त्री शितोळे यांच्या काल्याच्या किर्तना नंतर श्रीची आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दत्त जयंती यात्रा महोत्सवा साठी पुणे, मुंबई, सातारा आणि आजूबाजूच्या भाविक भक्तांनी हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासूनच दत्त भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली
होती. दत्त जयंती यात्रा महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयोजक बालअवधूत दत्ता महाराज यांनी अथक परिश्रम घेतले. यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सीताराम यादव, वसंत पाटील, महेश पाटील, अतुल कोरेकर ,गणेश कोरेकर, गणेश बागल, जगदीश पाटील, महेश यादव, दत्ता नलावडे, मनोज भोसले, वसंत शिर्के, सुरेश शिंदे, बाबा यादव, अक्षय तांबे, विजू बापू निकम, संतोष जाधव, नितीन मुळे, संभाजी बोरूळे, राजाराम गायकवाड,प्रशांत नेटके तसेच दत्तगुरू सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.