स्वामी विवेकानंद आय.टी.आय.च्या प्रवेशाला 15 जानेवारी पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ – अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : येथील जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंडस्ट्रीयल टे्रनिंग इन्स्टिट्यट अंतर्गत 4 कोर्ससाठी राज्य कमिटीच्या शिफारशीसने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली असून इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, डी.टी.पी. या चारही कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आले. परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमिवर या प्रवेश प्रक्रियेला 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जेसपीएमचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाच्यावतीने स्वामी विवेकानंद इंडस्ट्रीयल टे्रनिंग इन्स्टिट्यट अंतर्गत 4 कोर्ससाठी राज्य कमिटीच्या शिफारशीसने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास एन.सी.टी.व्ही. दिल्लीची मान्यता मिळालेली आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन- 2 वर्षे, वायरमन- 2 वर्षे, फिटर-2 , डी.टी.पी.1 वर्ष या चार कोर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. या आय.टी.आय.कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला कोरोणाच्या पार्श्वभूमिवर 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
स्वामी विवकानंद इंडस्ट्रीयल टे्रनिंग इन्स्टिट्युट टे्रनिंग,लातूरसाठी अनुभवी प्राचार्य व कर्मचारी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तसेच 100 टक्के कॅम्पस प्लेसमेंट, भव्य ईमारत, अद्यावत प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, यासह विविध उद्योगाच्या भेटीसह अमुल्य मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेवून आय.टी.आय.चे कोर्स पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व 100 टक्के नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या हमीसाठी स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल टे्रनिंग इन्स्टिट्युट लि.लातूर जेएसपीएम कॅम्पस पी-74 एमआयडीसी, पी.व्ही.आर.टॉकीज जवळ,कळंब रोड,लातूर येथे येवून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच अधिक माहितीसाठी प्राचार्य खय्युम शेख मो.9004134109, कॅम्पस प्रमुख चंद्रशेखर पाटील मो. 7767848425 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जेएसपीएमचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.