दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ. राजाराम पवार यांची नियुक्ती
लातूर (प्रतिनिधी) : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या (वरीष्ठ) उपप्राचार्य पदी प्रा.डॉ. राजाराम सखाराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी दि.29 डिसेंबर रोजी पदभार घेतला.
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी यांच्याहस्ते डॉ.राजाराम पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. रमेश बियाणी, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, संस्थेचे कर्मचारी श्री.सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
डॉ. राजाराम पवार यांनी दयानंद वाणिज्य महाविद्यालयात 32 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. अध्यापन करण्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या अभ्यास मंडळावर त्यांनी दोन टर्म काम पाहिले आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. डॉ.राजाराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 4 विद्यार्थ्यांनी पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. उपप्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.