प्रा. भास्कर अंकुश यांना पीएच. डी. प्रदान
देवणी (प्रतिनिधी) : येथील कै. रसिका महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. भास्कर प्रभाकर अंकुश यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान केली आहे. डॉ. भास्कर अंकुश यांनी श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. नानासाहेब शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली “सिंथेसिस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ सम बायोलॉजीकल इम्पॉरटंट हेटरोसायकल्स बाय कन्व्हेंशनल अँड नॉन-कन्व्हेंशनल मेथडस” या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल गोविंदरावजी भोपणीकर (अध्यक्ष, जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान, भोपणी), गाजननजी भोपणीकर (सचिव, जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान, भोपणी), प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी डॉ. भास्कर अंकुश यांचे अभिनंदन केले आहे.