पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या अध्यक्षपदी रोहित बंडगर तर सचिवपदी दत्ता चाळकापुरे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या अध्यक्षपदी रोहित बंडगर तर सचिवपदी दत्ता चाळकापुरे

देवणी (प्रतिनिधी) : देवणी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीची बैठक राम रुपनुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्ष रोहित राजकुमार बंडगर ,उपाध्यक्ष गणेश दिगंबर मिर्झापूरे, उपाध्यक्ष बाळु माधवराव कल्याणकर, सचिव दत्ता बलभीम चाळकापुरे, सहसचिव विष्णू संग्राम देवकते, कोषाध्यक्ष आदर्श आनंद म्हेत्रे, व सदस्य, मार्गदर्शक राम रुपनुरे, अनंत कल्याणकर, संतोष म्हेत्रे, यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यादेवी चे कार्य आणि इतिहास नव्या पिढीसमोर ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची सविस्तर माहिती येणाऱ्या पिढीला होण्यासाठी विविध उपक्रम आणि त्यांचे नियोजन केले जावे यासाठी बैठकीमध्ये अनेक विषय मांडण्यात आले. देवणी तालुक्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जनतेचा सहभाग वाढवून साजरी करावी, जयंती महोत्सवामध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यासाठी जनजागृती करावी असे ठरले.

About The Author