प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयाचे औषधे टाकली जाळून
लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या मतदार संघातील उपकेंद्रात घडला धक्कादायक प्रकार
निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील केळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे मागील महिन्यापासून बंद असून रुग्णांना असून अडचण नसून खोळंबा निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीच्या भयानक परिस्थिती मध्ये आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने नागरिकांच्या आरोग्य समस्येत भर पडली असून उपकेंद्रात अनेक औषध गोळ्या जाळून टाकण्यात आल्या तर काही कचऱ्यात फेकण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तालुक्यातील केळगावची लोकसंख्या साधारण पाच हजाराच्या घरात आहे.
अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत केळगाव प्राथमिक उपकेंद्र चालते, परंतु कोरोनाच्या भयानक परिस्थिती मध्ये मागील दोन महिन्यापासून येथील आरोग्य केंद्राला टाळे असल्याने आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे. परंतु कोणतेही अधिकारी फिरकले नाहीत यामुळे गावकऱ्यांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक आजाराचे निदान करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
संचार बंदी मुळे एसटी बसेस बंद आहेत नागरिकांना वाहतुकीच्या सुविधा नाहीत महामारी असताना नागरिकांमध्ये आजाराला घेऊन भीती आहे. गावांमध्ये जनजागृती करणे व औषध गोळ्यांचे प्राथमिक स्वरूपात वाटप करणे व माहिती देणे यासाठी आरोग्य केंद्राची शासनाने निर्मिती केली आहे. परंतु अशा महामारी च्या काळामध्ये मागील दोन महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे असल्यामुळे गावकऱ्यांच्या, वृद्ध महिला, पुरुष व बालके गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आज काही युकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली असता उपकेंद्रातला औषध गोळ्यांचा साठा कचऱ्यात धूळखात पडला असून अनेक बॉक्सेस औषधांचे हे जाळण्यात आले आल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला.
नागरिकांच्या प्राथमिक आजारांच्या समस्या ह्या दूर व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर लाखो रुपयांचा औषध पुरवठा केला जात आहे. मात्र केळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लाख रुपयाच्या कॅल्शियम विटामिन डी थ्री च्या व फॉलिक ऍसिड पॅरासिटामोल, गोळ्या कचऱ्यात फेकून जाळण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांचा मतदारसंघ अंबुलगा आणि उपकेंद्राच्या अंतर्गत हा केळगाव प्राथमिक आरोग्य चालतो परंतु अशा भयानक महामारीच्या काळामध्ये आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून शासनाच्या लाखो रुपयांची उधळण होत आहे.
केळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत आणि एम पी डब्ल्यू असा एकही माणूस मागील दोन महिन्यापासून तिथे फिरकला नसल्याने सामान्य नागरिक वयोवृद्ध महिला हे आरोग्य केंद्राला खेटे मारत आहेत व आरोग्य उपकेंद्रात लाखो रुपयाची औषध गोळ्यांचा स्टॉक जाळण्यात आला आहे ही खूप गंभीर परिस्थिती असून माननीय आमदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करावी.
केळगाव आरोग्य केंद्रातील सी एच डॉक्टर निलंबित झाले असून ते पद सध्या रिक्त आहे. बाकीच्या अडचणी सोडवण्यासाठी अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर रोडे यांना सांगतो असे निलंगा तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास कदम यांनी सांगितले.