दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525

दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525

नवीन 212 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 82397 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 212 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात आज फक्त 360 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 71 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 1904 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 141 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 87906 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3497 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 2012 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 82397 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525 आहे.

About The Author