हाळी व भागात अवैध धंद्याचा जोर, गरीबांना घोर.कोण आहे कमजोर ?
हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : मागील पाच महिण्यात तीनदा धाड टाकुन ips पोलीस अधिक्षक चाकुर—अह मदपुर निकेतन कदम यांनी अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो केले होते यामुळे निकेतन कदम यांना हाळी व भागातील गरीब सामान्य जनता दुआ- आर्शिवाद देतात.आणी ips कदम यांच्याकडेच या भागाचा कार्यभार कायम ठेवावा.अण् अधुनमधुन कदम यांनी रेड,धाडी टाकाव्यात.अशी हळी व भागातील जनतेची मागणी आहे. धाडी टाकुन कांही दिवस होतात न होतात तोच परत हाळीत व वडगाव रोड,बोरगाव रोड {ता.चाकुर} सुकणी हाळी,वाढोणा पाटी तसेच वायगाव पाटी,कुमठा,शिवनखेड रोड (तालुका अहमदपुर) आदी भागात असलेल्या ढाब्यात अवैध देशी-विदेशी दारुची खुलेआमपणे विक्री होते.तसेच हाळी, वायगावपाटी,वाढोणापाटी ,कुमठा.इ. गावात बंदी असलेला गुटखा / सुंगधी जर्दा याची विक्री होताना दिसते.तसे तर अनेकजण आॅर्डरप्रमाणे गुटखा होम डिलेव्हरी देतात.तसेच कल्याण, मिलन,डे,नाइट,इ.नावाचा मटका हा पुन्हा अनेक ठिकाणच्या हाॅटेल व ढाब्यात आॅनलाईन खेळत व खेळव त असल्याचे बोलले जाते.यामुळे या अवैध धंद्यावर धाडी टाकुनही परत परत हे धंदे कोणाच्या पाठींब्यावर जोरदारपणे चालतात?या धंदेवाल्या लोकांना तडीपार करणे शक्य नाही का?अवैध धंदेवाल्याचा सखा आणि पाठीराखा कोण?व कोणते,कोणते खाते व अधिकारी झालेत कमजोर? दरवेळेस ips पो.अ.कदम निकेतन यांनीच धाडी टाकाव्यात का?दारु बंदी,महसुल खाते गप्पगार का?असे रास्त प्रश्न हाळी व भागातील सजग नागरीकांतुन चर्चीले जात आहेत.