केंद्रेवाडीत मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस्थापना – व कळसारोहन सोहळा सोमवार, १५ मे रोजी भक्तिभावात संपन्न झाला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी गावातील लेकींनी कळस दिल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा साडी चोळीचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. कळस व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रथम लेझीम, टिपरे, टाळ, वीणा, मृदंग यांच्या गजरात गावभर मिरवणूक काढण्यात आली. हभप विजयानंद महाराज सुपेकर, बापूदेव महाराज बेलगावकर, हरिहर महाराज दिवेगावकर, धनंजय महाराज केंद्रे व ११ ब्रम्हवृदांच्या हस्ते पूजा करुन विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना – व कळसारोहन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती अयोध्या केंद्रे, अशोक केंद्रे, सरपंच ज्योती केंद्रे, उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे, मेजर बालाजी केंद्रे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.