लक्ष्मीनारायण मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्ष व कलशारोहण सोहळा

अहमदपूर- ( गोविंद काळे ) : शहरातील अंबाजोगाई रोड वर असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्ष व कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला असून जगन्नाथ पुरी येथील जगतगुरू १०८ इंदिरारमन स्वामी यांच्या व दक्षिण भारतातील पुरोहित यांच्या हस्ते विधिवत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे शहर भरात डिजिटल व पोस्टर लागले असून शहर सजले आहे, दि 23 ते 25 मे होणाऱ्या या कार्यक्रमात होम हवन,विष्णू सहस्त्रनाम पाठाचे वाचन,गोपुजा, गोपुरम कलशारोहण सोहळा,महापूजा ,तिरुपावे पाठ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमास राज्य भरातून भक्ताची उपस्थिती राहणार असून सदरील कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवहन मंदिर समिती चे रामबिलाससेठ सोनी, यतिराज सोनी,जुगलकिशोर सोनी,श्यामसुंदर सोनी,घनश्याम सोनी ,राजेश सोनी ,संजय सोनी,पुरशोतम सोनी, प्रशांत सोनी,हरिप्रसाद सोनी,रंगनाथ भुतडा,व्यंकतेश सोनी,लखन सोनी ,निलेश बाहेती,आशिष सोनी यांच्या सह मंदिर समिती ने केले आहे

About The Author