महात्मा फुले महाविद्यालय दहशतवाद विरोधी दिन साजरा

महात्मा फुले महाविद्यालय दहशतवाद विरोधी दिन साजरा

अहमदपूर, ( गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागातील ज्येष्ठ प्रोफेसर ह. भ. प.डॉ.अनिल मुंढे महाराज होते.तर, प्रशांत डोंगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दहशतवाद विरोधाची शपथ घेऊन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!