पोलिस फ्लॅश न्यूजचा दणका; नादुरुस्त फ्रिज मोफत दुरुस्त करून दिला

अहमदपुर ( गोविंद काळे ) : येथील पुजा इलेक्ट्रॉनिक्स येथून ग्राहक अनिकेत फुलारी यांनी १८ एप्रिल २०१८ रोजी गोदरेज कंपनीचा फ्रिज खरेदी केला होता. दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी तो फ्रिज नादुरुस्त झाला. दुरुस्तीसाठी पुजा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे जाऊन. वेळोवेळी माहिती दिली, कंपनीच्या कस्टमर केअरला नोंद केली, फ्रिज दुरुस्तीसाठी मेकॅनिक मुनीर यांनी ६५००/- रुपयांची मागणी केली. त्याविरुद्ध ग्राहक अनिकेत फुलारी यांनी ग्राहक मंच गाठले, ॲड जवळकर यांच्या मार्फत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली.

पोलिस फ्लॅश न्यूजचा दणका; नादुरुस्त फ्रिज मोफत दुरुस्त करून दिला

नोटीशीत वाॅरंटीत असलेले काॅम्प्रेसर मोफत देण्यात येवून तात्काळ दुरूस्ती करून नुकसान भरपाई २०००/- रुपये देण्यात यावेत, अन्यथा पुढील कार्यवाहीसाठी तयार रहावे असे कळवले. ॲड जवळकर यांनी दिलेल्या नोटीशी नुसार मला माझा फ्रिज मोफत काॅम्प्रेसर देऊन दुरुस्त करून मिळाला. पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनी विरुद्ध माझी काहीही तक्रार नाही.

पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनीला ग्राहक मंच्यातून नोटीस बजावण्यात आली होती. याची ठळकपणे पोलीस न्यूज मध्ये प्रसिद्धी दिल्यामुळे गोदरेज कंपनीला दखल घ्यावी लागली. मला माझा फ्रिज मोफत दुरुस्त करून मिळाला. या बद्दल मी पोलिस न्यूजचे आभार व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया ग्राहक अनिकेत फुलारी यांनी दिली.

About The Author