उदगीरचे नावलोकिक मातृभूमी महाविद्यालयाने वाढवले – तहसीलदार रामेश्वर गोरे

उदगीरचे नावलोकिक मातृभूमी महाविद्यालयाने वाढवले - तहसीलदार रामेश्वर गोरे

उदगीर (एल.पी.उगीले) : कोरोना काळात आरोग्य सेवेत प्रशासनाला मातृभूमीने केलेल्या मोलाच्या मदतीमुळे आज उदगीरचे नाव मातृभूमीच्या माध्यमातून लोकं ओळखू लागले असल्याचे मत प्र.उपजिल्हाधिकारी रामेश्वर गोरे यांनी व्यक्त केले. ते मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी नर्सिंग स्कूल (ए एन एम) व कस्तुराबाई नर्सिंग स्कूल (जी एन एम) च्या १३ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा प्रतिज्ञा व दीप प्रज्वलन समारंभात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश रे उस्तूरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्तकर्त्या व बिगबाॅस फेम तृप्ती देसाई , पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुडाळे , मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी, उदगीर रुग्णालय परिचारिका माधवी जळकोटे , जळकोट रुग्णालय येथील परिचारिका सुनंदा वाघमारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, परिचारिकांनी घेतलेली आरोग्य सेवेची शपथ कायम लक्षात ठेवून जीवनात आरोग्यसेवा करावी . मातृभूमीच्या विद्यार्थ्यांनी कोविड काळात लसीकरणासाठी हातगाडे, ठेलेवाले यांचे सर्वे विषयी केलेली जनजागृती , व दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. मातृभूमीकडून दिले जाणारे उत्कष्ठ व दर्जेदार आरोग्य शिक्षण आणि प्रात्यक्षिक यामुळे उत्कृष्ठ परिचारिका आरोग्य सेवेत दाखल होत आहेत. ही कौतुकाची बाब आहे.

या प्रसंगी तृप्ती देसाई या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की,आपण प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते . आपण आहोत त्या ठिकाणी उत्कृष्ठपने कार्य केले तर थोड्या काळाने यश मिळतेच. कोरोनाच्या काळात सर्वजन घरी बसुन होते तेव्हां नर्स व डाॅक्टर यांनी कुठलीच तमा न बाळगता सेवा केली, त्यामुळे रुग्णसेवा म्हणजे ईश्वरीय कार्य आहे. ही भावना समाज मनामध्ये रुजली.

यावेळी विद्यार्थ्याना उदगीर रुग्णालय परिचारिका माधवी जळकोटे आणि जळकोट रुग्णालय येथील परिचारिका सुनंदा वाघमारे यांनी आरोग्य सेवेची शपथ दिली. मातृभूमी व कस्तुराबाई नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी परिक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे संचलन अस्विनी देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी रेखा रनक्षेत्रे , बिराजदार मिरा , ओंकारे जगदीशा , इंगळे जया ,राठोड आकाश ,राहुल जाधव , दयानंद टाके , विवेक देवर्से , रणजित मोरे , उस्ताद सय्यद यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले .

About The Author