हज यात्रेकरुंसाठी यांच्यासाठी लसीकरण आवश्यक आहे भाविकांनी लसीकरण करून घ्यावे – आमदार संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : परमेश्वराबद्दल प्रचंड निष्ठा ठेवून त्याचा आदेश पाळण्यासाठी पवित्र हज यात्रेसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जात जगभरातून भाविक या ठिकाणी एकत्र अशा गर्दीच्या वेळी आपल्या मतदार संघातील भाविक भक्तांनी सुदृढ राहावे अशी भावना ठेवून आमदार संजय बनसोडे यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेत लसीकरण मोहीम राबवली.देशभरातुन हज यात्रेसाठी लाखो मुस्लीम समाजातील नागरीक जात असतात. याही वर्षी उदगीर तालुक्यातील मुस्लीम समाजबांधव हे हज या त्यांच्या धार्मिक स्थळी मोठ्या संख्येने जात आहेत. आपल्या भागातील समाजबांधव हज यात्रेसाठी जात असल्याचे आ.संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी प्रशासनास सुचना देवून त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर व लसीकरणाचे आयोजन केले. या पवित्र हज या स्थळी जावून येण्यासाठी त्यांना तब्बल १ महिन्याचा कालावधी लागत असुन हज यात्रेसाठी जाणा-या समाजबांधवांसाठी आरोग्य शिबाराचे आयोजन उदगीर येथील सामान्य रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी यात्रेकरुंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात आले.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत यात्रेकरुंना लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दत्तात्रय पवार, डाॅ.शशिकांत देशपांडे, माजी नगरसेवक अहमद सरवर, सय्यद जानी,मोतीलाल डोईजोडे, हज यात्रा कमिटीचे सदस्य अर्शद अली देशमुख व सामान्य रूग्णालयातील डाॅक्टर उपस्थित होते.उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात २०२३ मध्ये हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांसाठी दि. २२ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करण्यात आली आहेत. उदगीर मधुन 65 भाविक हज यात्रेसाठी रवाना होणार आहेत. तत्पूर्वी त्यांना आरोग्य तपासणी, लसीकरण आदी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे. तर लातूर जिल्हयातुन तब्बल ६०० बांधव हज यात्रेला जाणार असल्याची माहिती आहे.