श्यामलाल कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीत घवघवीत यश

श्यामलाल कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीत घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीरच्या शैक्षणिक परंपरेत सतत अभिमानास्पद निकाल देणाऱ्या आणि एक आदर्श महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शामलाल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे.

सर्वसामान्य परिवारातील आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना घेऊन ज्ञानदान करणाऱ्या आणि ना दान ना डोनेशन तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया राबवणाऱ्या या महाविद्यालयात सतत गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुले असतात. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत, जगाच्या पाठीवर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे यशस्वी अभियंता, डॉक्टर्स, उद्योजक, संशोधक म्हणूनही यश संपादन केलेले अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रगतीची जाण निर्माण करून देणाऱ्या या महाविद्यालयाचा निकाल परंपरेला साजेस आहे. विज्ञान शाखेत सर्वप्रथम कदम वैभव सुनील,सर्व द्वितीय हंडे पवन हनुमंत, सर्व तृतीय कच्छवे पवनसिंह पुंडलिक तर कला शाखेत सर्वप्रथम कांबळे ज्योती समाधान, सर्व द्वितीय जाधव अहिल्या सतीश, सर्व तृतीय कसबे महेश सखाराम आले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, सचिव विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनी आर्य, प्राचार्य आनंद चोबळे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर सपाटे, राहुल लिमये, भारत खंदारे, घोगरे संग्राम, श्रीमती मीनाक्षी मोघेकर, सगर संतोष, पाटील शरद, सोनकांबळे सुभाष आदीने अभिनंदन केले आहे.

About The Author