महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.३५ टक्के

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.३५ टक्के

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा निकाल ९२.३५% लागला असून विज्ञान शाखेत तांदळे सुमित संदीप ८१.८३/% प्रथम, दाजी आश्विनी ओमप्रकाश ७७.७६% द्वितीय, पेंसलवार समृद्धी नितीन ७७% तृतीय, विशेष प्राविन्य ५, प्रथम श्रेणीत ५४, विज्ञान शाखेचा निकाल ९६.११ टक्के लागला. वाणिज्य शाखेत प्रथम पवार वैष्णवी वसंत ९२.६७%, द्वितीय कारगिर भाग्यस रवींद्र ९०.६७%, तृतीय नवटक्के कृष्णा बाळासाहेब ८८.५०%, विशेष प्राविण्यात १६, प्रथम श्रेणी २५, वाणिज्य शाखेचा निकाल /८५.९६% लागला आहे. कला शाखेत प्रथम कुंडगीर वैष्णवी सोनबा ८६.८३ टक्के, द्वितीय गायकवाड प्रतीक विजयकुमार ८४.३३%, तृतीय राठोड शुभम बालाजी ८१.१७% , विशेष प्राविण्‍यात ५,प्रथम श्रेणीत १५, कला शाखेचा निकाल ८५.९६% लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, वॲड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव ॲड.एस.टी. पाटील,व डॉ.रामप्रसाद लखोटिया,कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ.आर .के .मस्के, उपप्राचार्य डॉ. एस .जी. पाटील ,उपप्राचार्य सी.एम. भद्रे, पर्यवेक्षक प्रा. जे.आर. कांदे, प्रा. एस.जी. कोडचे, प्रा. टी.एन .सगर यांनी अभिनंदन केले आहे

About The Author