प्रा.डॉ.राजकुमार मस्के आणि प्रा.डॉ.सुधाकर पाटील यांनी पदभार स्वीकारला
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजकुमार मस्के हे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी तर प्रा.डॉ.सुधाकर पाटील यांनी उपप्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. प्रा.डॉ.बी.एम. संदीकर यांचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपल्याने, प्रा.डॉ. राजकुमार मस्के हे प्रभारी प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. प्रा.मस्के यांनी यापूर्वी मराठी विभाग प्रमुख म्हणून 13 वर्ष कार्य केले आहे. अध्ययन-अध्यापनाबरोबरच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, स्टाफ सिक्रेटरी, विद्यार्थी कल्याण मंडळ, उपप्राचार्य,पीएच.डी. आणि एम.फिल. चे 16 वर्षापासूनचे संशोधन मार्गदर्शक, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, महात्मा गांधी वाचनालय व महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या ग्रंथालय समितीचे सदस्य, अंतर्गत गुणवत्ता सुनिश्चयन कमिटीच्या समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. प्रा.पाटील यांनी रसायनशास्त्र विभागप्रमुख म्हणून 11 वर्षे कार्य केले आहे, त्याबरोबरच उपप्राचार्य, पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल प्रा.डॉ.राजकुमार मस्के आणि उपप्राचार्य पदाचा प्रा.डॉ.सुधाकर पाटील यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच संस्था सदस्य प्रा.मनोहर पटवारी, शिवराज वल्लापुरे, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार, श्रीमती ललिता पाटील, सुभाष धनुरे, प्र.प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य सी.एम.भद्रे पर्यवेक्षक प्रा.जे.आर. कांदे तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा.प्रवीण जाहुरे यांनी केले. आभार ग्रंथपाल डॉ.एल. बी. पेन्सलवार यांनी मानले.