लायन्स क्लब आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने मुलीचे कन्यादान
उदगीर (एल.पी.उगीले) : लायन्स क्लब उमंग व लायन्स क्लब उदगीर च्या वतीने निसर्गाने ऐनवेळी एका मुलीच्या वडिलांचा अपघात होऊन आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लग्न तिथी ठरलेला, सर्व तयारी झालेली. मात्र दुर्दैवाने पत्रिका वाटतानाच उदगीर बिदर रोडवर समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्यामुळे, शिवराज पांचाळ यांचा गंभीर अपघात झाला. आणि त्यांचे दोन्ही पाय 90% फ्रॅक्चर झाले, तर त्यांचा पुतण्या श्रीनिवास पांचाळ याचा या अपघातात मृत्यू झाला. दैवाने जणू परीक्षा घेतली की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पत्रिका वाटप करणे आणि विवाहाची तयारी करणे दूरच, रुग्णालयाचा खर्चही मध्येच आला. “गरिबीमे आटा गिला”म्हणतात, तशी परिस्थिती निर्माण झाली.
कन्यादान करण्यासाठी ठेवलेली तुटपुंजी रक्कमही दवाखान्याला खर्च झाली. अशावेळी उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुभाष वाकोडे, लायन्स क्लब उमंगचे अध्यक्ष विवेकचंद जैन, लायन्स क्लबचे कोषाध्यक्ष योगेश चिद्रेवार, सचिव प्रा. अशोक पांचाळ यांनी पुढाकार घेतला आणि लायन्स क्लब नेत्र रुग्णालयाच्या सभागृहामध्ये शिवराज पांचाळ यांची सुकन्या पल्लवी पांचाळ तिचा शुभविवाह संपन्न केला. या सोहळ्याच्या यशस्वीतते साठी लायन्स क्लबने पुढाकार घेतला असला तरीही उदगीर येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, नेतेमंडळींनी पुढाकार घेऊन या शुभ कार्यात हातभार लावला. एका गरजवंतांच्या मुलीचा कन्यादानाचा कार्यक्रम संपन्न होत असताना भारतीय जनता अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजप युवा मोर्चाचे नवज्योत शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष महादेव घोणे, योगेश चिद्रेवार, तात्याराव शिंदे इत्यादींनीही आवर्जून उपस्थिती नोंदवत वधूवरांना शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यकाळातही आपण सदैव या परिवारासोबत असून अडीअडचणीला सोबत राहुन सर्वतोपरी सहकार्य करू. असे आश्वासनही दिले आहे. या घटनेने उदगीर मधील जनतेचे सामाजिक जाणीव जपण्याचे कार्य जनतेच्या समोर आले आहे.