पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तोगरीचा ९१.४४% निकाल

पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तोगरीचा ९१.४४% निकाल

उदगीर (एल.पी.उगीले) : फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२वी बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून उज्वल यशाची परंपरा कायम टिकवणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९१.४४% निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत देत, त्यांच्यामध्ये सामाजिक जाण निर्माण करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उज्जवल निकालाची परंपरा चालू ठेवली आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, शिक्षणाने सामाजिक प्रगती साधता येते. या उदात्त हेतूने मनोहरराव येरनाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तोगरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करून शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत पोहोचवली. त्यांनी लावलेल्या शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावी बोर्ड परीक्षेत यावर्षी एकूण २७० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्या पैकी २४६ उतीर्ण झाले आहेत, विज्ञान शाखेचा ९६. ९७% तर कला शाखेचा ८१. १७% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत प्रथम कु. रंजनी लक्ष्मण लोभाजी 84%, द्वितीय कल्लेश्वर संजय जवळगे ८३.१७, तृतीय रागवेंद्र जयप्रकाश विरादार ८३% तर कला शाखेतून प्रथम पुनम होटकर ७८ .३३%, द्वितीय बस्वराज गंगापुरे ७७.१७%, तृतीय कु.संध्या बामणे ७६. ३३% गुण घेतले असून विशेष प्राविण्यासह १४ विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. १४३ विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि ८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उर्तीण झाले आहेत. उतीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्रीमती इंदुमती मनोहरराव येरनाळे, अध्यक्षा सौ. शांत्तम्मा पंडितराव पाटील, कार्याध्याक्ष महेश मनोहरराव येरनाळे, प्राचार्या सौ .वंदना महेश येरनाळे, उपप्राचार्य गुणवंत काळगापुरे, पर्यवेक्षक लक्ष्मण लोभाजी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उतीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!