मोठी बातमी : महसूल विभागाने जप्त केलेला वाळूचा हायवा अज्ञात व्यक्तीने नेला पळवून ; पोलिसात गुन्हा नोंद
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील महसुल विभागाने साधारणतहा: तीन महीण्यापुर्वी अवैद्य वाळू वाहतुक करणारा हायवा टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावला होता तो हायवा अज्ञात व्यक्तीने त्यातील वाळू जागेवरच खाली करून पळवुन नेल्याची घटना दि २५ मे रोजी घडली असुन अज्ञात व्यक्तीविरोधात अहमदपूर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तहसील कार्यालयाने अवैद्य वाळु वाहतुक करणाऱ्या हायवावर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणुक केली होती त्यातील पथक क्रमांक चार ने दि २ फेब्रुवारी रोजी काळेगाव-अहमदपूर रोडवर रात्री अंदाजे १०: ३० वाजेच्या दरम्यान सोनु मोरे रा सोनखेड ता लोहा जि नांदेड यांच्या मालकीचा हायवा क्रमांक एम एच ४६ बि ई ४७५६ अवैद्य वाळूने भरलेला हायवा जप्त करून तहसील कार्यालयातील परिसरात आणुन उभा केला होता तो वाळूने भरलेला हायवा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि २५ मे रोजी अंदाजे पहाटे २ : ०० ते ५ : ०० वाजेच्या दरम्यान हायवातील वाळू तहसील कार्यालयातील परिसरात खाली करून अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचा हायवा पळवुन नेल्याची घटना घडली असुन दि २६ मे रोजी मंडळ अधिकारी स्वाती प्रल्हादराव वाघे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीसांत गुरनं ३१४ / २०२३ भारतीय दंड संहिता १८६o कलम३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत