यशवंत चे बारावी च्या परीक्षेत घवघवीत यश
वाढवणा (बु.)(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.विज्ञान शाखेचा निकाल 100 % तर कला शाखेचा निकाल 91.48. %असून किमान कौशल्य शाखेचा 97.05% निकाल लागला आहे.
कला शाखेतून चाणकने अर्चना मारोती 87.67 % गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे, तसेच बिरादार मोहिनी माऊली 81.50 % गुण घेऊन द्वितीय आली आहे. तर चाणकने तैनया सुरेश 80.50% गुण घेऊन तृतीय आली आहे.
विज्ञान शाखेतून बोडेवार कृष्णा बस्वराज 83.00% गुण घेऊन सर्वप्रथम आला आहे. तर उळागड्डे वैधवी बालाजी 82.33% गुण घेऊन द्वितीय आली आहे. व शिंदे किशोर निळकंठ 80.83% गुण घेऊन तृतीय आला आहे.अर्थशास्त्र या विषयात चाणकने अर्चना मारोती 100 पैकी 96 गुण घेऊन केंद्रात सर्वप्रथम आली आहे, तर इतिहास या विषयात ढोकाडे ऋतुजा एकनाथ 100 पैकी 95 गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. हिंदी विषयात चाणकने अर्चना मारोती 100 पैकी 94 गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. पिकउत्पादनशास्त्र या विषयात 100 पैकी 99 गुण मिळविलेले 13 विद्यार्थी आहेत. जिवशास्त्र या विषयात शिंदे किशोर निळकंठ 100 पैकी 91 गुण घेऊन सर्वप्रथम आहे. रसायनशास्त्र या विषयात बोडेवार कृष्णा बस्वराज 100 पैकी 85 गुण घेऊन सर्वप्रथम,मराठी या विषयात बिरादार मोहिनी माऊली 100 पैकी 90 गुण घेऊन सर्वप्रथम आहे.
कला शाखेतून विशेष प्राविण्यासह 7 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर विज्ञान शाखेत विशेष प्राविण्यासह 9 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थांचे बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेबजी जाधव, उपाध्यक्षा सौ.दिपालीताई जाधव, सचिव आ. बाबासाहेबजी पाटील , सहसचिव बळीरामजी भिंगोले गुरुजी,सहसचिव अविनाशभैया जाधव, कोषाध्यक्ष अंकुशरावजी कानवटे , श्रीमती कुमुदिनीताई जाधव,सुरज पाटील, प्राचार्य प्रल्हादराव जाधव, पर्यवेक्षक प्रा. विरभद्र बिरादार ,प्रा.मनोजकुमार माने, किशनराव ढोकाडे, मु.अ. सुनीता फड तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.