ऋषीकेश सुरवसे यांनी उदगीरची शैक्षणिक परंपरा जपली : आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या कुटुंबाची प्रगती ही केवळ शिक्षणानेच होते. लहान वयापासूनच पालक व गुरुजन वर्ग आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करून त्यांना मोठ्या पदावर जाण्यायोग्य तयार करतात, म्हणूनच आज देशात मोठ्या पदावर तरुण पिढी विराजमान होत आहे. हे केवळ शिक्षणामुळे ही प्रगती असून उदगीरचा स्वाभिमान ऋषीकेश सुरवसे यांनी वाढवला, असल्याचे गौरवउद्गार माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी काढले.
ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी – १ पदी उदगीर येथील ऋषीकेश महावीर सुरवसे यांची नुकतीच निवड झाली, त्याबद्दल त्यांचा सत्कार सुरवसे यांच्या निवासस्थानी आ. संजय बनसोडे यांनी शाल, पुष्पहार व फेटा बांधून केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सौ.अर्चना सुरवसे, महावीर सुरवसे, महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, प्रा.श्याम डावळे, रामकिशन नादरगे, सर्जेराव भांगे, बाळासाहेब मरलापल्ले, श्याम हारमुंजे, प्रमोद देविदास केंद्रे, पंडित सोनवणे, उत्तमराव हरमुंजे, किशनराव हरमुंजे, कृष्णा पाटील, धवलशंख निशांत, धनंजय मुंडे, सतीश क्षीरसागर, सतिश पाटील मानकीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.