संदीप भुजबळे हिंदी विषयात लातूर बोर्डामध्ये सर्वप्रथम

संदीप भुजबळे हिंदी विषयात लातूर बोर्डामध्ये सर्वप्रथम

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या संदीप भुजबळे यांनी हिंदी विषयात तब्बल 98 गुण घेऊन बारावी बोर्ड परीक्षेमध्ये लातूर विभागीय शिक्षण मंडळातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर याच महाविद्यालयाचे विद्यार्थी स्नेहा दादापुरे हिने 94 गुण तर श्रद्धा सोलापूर हिने 90 गुण घेऊन हिंदी विषयात आपला दबदबा निर्माण केला आहे. या सर्वांना हिंदी विषय शिक्षक प्रा. गणेश बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपुरकर, संस्था सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, , सहसचिव प्रभुराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकराप्पा हरकरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर,उप-प्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.माधव भंडारे, एचएसव्हीसी चे पर्यवेक्षक प्रा.अनिल बिरादार, विषय शिक्षक प्रा गणेश बिरादार, कार्यालयीन अधीक्षक श्री.सूर्यकांत धनुरे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!