आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज येथे विलासराव देशमुख यांची जयंती साजरी

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज येथे विलासराव देशमुख यांची जयंती साजरी

देवणी (प्रतिनिधी) : येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे, विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे उपप्राचार्य डॉ सोनटक्के, क्षेमानंद कन्नडे व वसतीगृह अधीक्षक वैष्णवी बिरादार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे संस्था अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर व संस्था सचिव गजाननजी भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश अंबेनगरे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!