डोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण समारंभ!
अहमदपूर ( गोविंद काळे ) जलजीवन योजनेअंतर्गत चाकूर तालूक्यातील डोंग्रज येथे मंजूर करण्यात आलेल्या ५२ लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन व १० लक्ष रुपयांच्या सभागृहाचा लोकार्पण समारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी सुसंवाद साधत विविध समस्या जाणून घेतल्या.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव घुमे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, सुदर्शनजी मुंढे, गंगाधरआप्पा अक्कानरू, उत्तमराव वाघ, गणपतराव नितळे, अनिलराव वाडकर, प्रा.बी.डी पवार, अंतेश्वर पाटील, विश्वनाथ एडके, विष्णू तिकटे, समाधान डोंगरे, देवानंद पाटील, अजय घोरपडे, ओम केंद्रे, संदीप शेटे, गणेश पाटील, प्रमोद जवळे, सचिन बदनाळे, दयानंद पाटील शेळगावकर,धनंजय बाचीफळे, डोंगरज सरपंच व्यंकटराव कैलवाड, उपसरपंच परमेश्वर केंद्रे, राजाराम नरवाड, आप्पाराव नरवाड, प्रकाश खापरले, वहाब हडोळतिकर, धनाजी मुंडे, तानाजी कांबळे, पंडित माने, मगदूम मणियार , रफिक बागवान, सोपान शिंदे, मनोज घुमे, मन्मथ वारद, गोविंद मुंडे, उत्तम देवणे, शुभम घुमे, श्रीकांत देवणे, नारायण कासार आदी ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
