पोलीस खात्याने “टपरी”हटवावी. अन्यथा ; हाळी येथील अतिक्रमित जागेतील “टपरी” करु शकते 2 धर्मात “ब्लास्ट”

पोलीस खात्याने "टपरी"हटवावी. अन्यथा ; हाळी येथील अतिक्रमित जागेतील "टपरी" करु शकते 2 धर्मात "ब्लास्ट"

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : हाळी ता.उदगीर येथे असलेल्या छ.शिवाजी महाराज यांचे चौकाच्या व अहमदपुर रोड लगत असलेल्या गरीब व्यापारी महिलेच्या मालकी हक्काच्या दुकाणासमोर गावातील एका विशिष्ट धर्माच्या चहा विक्रेत्याची “टपरी” आहे.व ही “टपरी” त्या गरीब व्यापा-यांच्या दुकाणाच्या शटरपुढे असल्याने दुकाणदारी करणे अवघड झाले आहे.यामुळे ही “टपरी” येथून काढा.अशी विनंती करणा-या व मालकी हक्काची जागा असलेल्या त्या दोन गरीब व्यापा-यांनाच धमकी देत असल्याची तक्रार ग्रा.पं.हाळी यांना देऊनही कांहीच उपयोग झाला नाही.उलट जीवे मारण्याची धमकी टपरीधारक कुटूंबासह टपरीधारकांचे कांही नातेवाईक देत असल्याची लेखी तक्रार i.p.s. “सिंघम” पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांचे मार्फत डीवायएसपी.अहमदपुर यांना सुरेखा सत्यनारायण महाजन व मरेवार संजू किशन यांनी दिली आहे.व ही टपरी मा.कर्तबगार पोलीसांनी त्वरीत नाही हटवली तर हाळी येथे दोन धर्मा मध्ये ही”टपरी” जातीयतेढ व “ब्लास्ट” करु शकते.अशी जाणकार मंडळी चर्चा करतात.तसेच टपरीधारकाकडे कांही एक कागदं नाहीत.तरी 2 तक्रारदार गरीब व्यापा-यांना मारण्याची धमकी टपरीधारक देतोय.तसेच दुकाणापुढे टपरीधारकासह त्याच्या कांही जात्यांध नातेवाईकांनी धिंगाना केला होता.अशीही कुजबूज हाळीत होतेय. याची थोडक्यात माहीती अशी की, गत कांही दिवसापासुन हाळी आणी हंडरगुळी या 2 गावातील सा.बां.खाते च्या जागेतील अतिक्रमण काढले जात असुन,हाळीच्या छ.शिवाजी पुतळ्या लगत असलेली व सा.बां. खात्याच्या जागेवर असलेली चहाची टपरी सा.बां.खात्याच्या जागेत आहे. म्हणुन तेथून काढली होती.व त्याच जागेवर नियमानुसार नाला खोदला.व अतिक्रमीत जागेतील हटवलेली चहा टपरी मालकाने अन्यञ घेऊन गेला नाही.उलट तिथेच मागच्या बाजुला असलेल्या गरीब व्यापा-यांच्या शटर पुढे दोन्ही बाजुंनी दोरीने बांधुन उभा केली आहे.व ही टपरी आमच्या शटर पुढे का उभा केलात.आमच्या मालकी हक्काच्या दुकाणापुढे ही टपरी ठेऊ नका.आमचे दुकाण उघडे असल्याचे ग्राहकांना दिसत नाही.तरी क्रपया ही टपरी अन्यञ घेऊन जावा.अशी हात जोडून विनंती करणा-या त्या दोन तक्रारदारांनाच हा टपरीधारक अण् त्याचे कांही जात्यांध नातेवाईक तुला व अपंग सावकारास मारु.पण ही टपरी येथून कोठे पण हलवणार नाही.आणि सा.बां.खाते व पोलीस खात्याचा कोणता “माय का लाल” पोलीसवाला ही “टपरी” येथून काढण्याचे व आमचे वाकडे करायचे “धाडस” करु शकत नाही.असली मगरुरीची व घमेंडी भाषा टपरीवाला व त्याचे कांही गुंड प्रव्रत्तीचे असलेले जात्यांध नातेवाईक करत होते.व ही भाषा एका “खाकी”वाल्याच्या शुभ आर्शिवादाने करतात.अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीत होत असुन ज्या 2 व्यापा-यांनी सत्तर साली जागा खरेदी घेतली.व त्याची हाळी ग्रा.पं.मध्ये न.नं.8 अ.ला नोंद आहे.आणी असे असतानाही टपरी धारकाकडे याचे कसलेच कागद तसेच त्या जागेचा मालक असल्याचा कोणताच पुरावा नाही.म्हणे.उलट अतिक्रमण करुण व गरीब व्यापा-यांना दाबदडपण करुन त्या गरीब व्यापा-यांच्या मालकी हक्काच्या जागेपुढे अतिक्रमण केले. असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.अण् याची रितसर तक्रार देऊनही ग्रा.पं.चे प्रशासन ही टपरी हटवीण्याऐवजी मतांसाठी टपरीधारकासह त्यांच्या जात्यांध व गुंडप्रव्रतीच्या नातेवाईक मंडळींची x कुरवाळतात.असा सुर ञस्त व्यापारीवर्गातुन ऐकू येत आहे. तरी याबाबत कर्तबगार पोलीसांनी त्वरीत लक्ष घालुन ही टपरी काढावी. व टपरीधारकांसह त्या व्यापा-यांशी अरेरावी करणा-या जात्यांध आणी गुंड प्रव्रत्तीच्या त्या नातेवाई जात— भाईवर कारवाही करावी.अन्यथा या “टपरी”मुळे दोन धर्मात जातीयतेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होऊन जातीयवादाचा “ब्लास्ट” होऊ शकतो.अशी चर्चा हाळीतील जाणकार जनतेत हळुवार आवाजात होत आहे.तसेच याबाबतची रितसर तक्रार सौ.सुरेखा सत्यवान महाजन यांनी i.p.s.सिंघम पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांचेद्वारा डीवायएपी, अहमदपुर यांचेकडे लेखी स्वरुपात दिली आहे.तसेच आता लवकरात लवकर पोलीसांनी दोन धर्मात जाती- वादाचा “ब्लास्ट”होऊ नये म्हणुन ही टपरी हटवावी.व या टपरीधारकांसह हाळीतील त्याच्या कांही जात्यांध व गुंडप्रव्रतीच्या त्या लोकांना कोणाचा आर्शिवाद आहे. “खाकी” का ? “खादी” वाल्यांचा.हे ही शोधणे व त्यांचेवर कार्यवाही करणे गरजेचे आहे..अन्यथा जातीयतेढ निर्माण झालाच म्हणुन समजा.अशी चर्चा दबक्या आवाजात जनतेत आहे..

About The Author

error: Content is protected !!