स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा, 04 लाख 56 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जुगार अड्ड्यावर दहा टाकून चार लाख 56 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 28/05/2023 रोजी सायंकाळी 17.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील आर्वीत छापा मारला असता तेथे इसम नामे, संभाजी बाळासाहेब भोसले, (वय 32 वर्ष, राहणार कळंब रोड ,एमआयडीसी, लातूर), राजेश उर्फ विशाल भागुराम उपाडे,( वय 29 वर्ष, राहणार साई रोड ,नवरत्न नगर, लातूर), अजय विजयकुमार पांढरे,( वय 29 वर्ष, राहणार साईरोड, नवरत्न नगर, लातूर),बिलाल एजाजमिया शेख, (वय 29 वर्ष, राहणार कापूर रोड, लातूर),रणजीत शेळके, (वय अंदाजे 30 वर्ष, राहणार साईरोड, लातूर. (फरार)), ऋषिकेश माने, (वय अंदाजे 25 वर्ष, राहणार होळकर नगर,लातूर. (फरार)), पंकज अनिल शिंदे, (वय अंदाजे 32 वर्ष, राहणार सिद्धेश्वरचौक ,लातूर (फरार)), राजाभाऊ गायकवाड, (वय अंदाजे 32 वर्ष, राहणार संत गोरोबा सोसायटी, लातूर . (फरार))असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 04 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी विरोधात पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व 4 इसमांना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, मनोज खोसे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर ,रवी गोंदकर, राहुल कांबळे यांनी केली आहे.