रंगकर्मी प्रतिष्ठानच्या बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले),येथिल सामाजिक ,सांस्कृतीक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करित असलेल्या रंगकर्मी साहित्य,कला ,क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने हावगीस्वामी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट येथे आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या . स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी उपजिल्हाधिकारी रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सतिश उस्तुरे,भरत चामले ,प्रा रामकिशन सोनकांबळे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे , रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. ज्योती मद्देवाड आकाश मंठाळकर, माधवशेठ नागरगोजे ,अॅड.शिवाजी राठोड , डॉ,नागनाथ कवडगावे , रमेश हणमंते , अब्दुल सय्यद , नरहरी नागरगोजे. आदी उपस्थित होते.
बीड ,धाराशिव ,पुणे ,नांदेड ,लातूर,हिंगोली आदी ठिकाणाहुन आलेल्या खेळाडूंच्या बॅडमिंटन स्पर्धेत खुला गट एकेरी प्रथम पारितोषिक ओजस कुलकर्णी-पुणे द्वितीय चेतन माने -नांदेड तृतीय अक्षय वाघमारे उदगीर
खुला गट दुहेरी प्रथम चेतन माने आणि परीक्षित-हिंगोली, द्वितीय संतोष स्वामी व केतन कार्लेकर-नांदेड, तृतीय ओम पवार अक्षय वाघमारे-उदगीर.
खुला 35 वर्षावरील दुहेरी गटामध्ये प्रथम दत्ता थाटकर आणि सागर तोष्णीवाल लातूर मुरुड ,द्वितीय प्रवीण चव्हाण व रणजीत पाटील-धाराशिव, तृतीय संतोष स्वामी, रमेश देशमुख-नांदेड तसेच
बेस्ट शूटर – परीक्षित नांदेड
बेस्ट डिफेंडर – अश्वघोष नांदेड
मॅन ऑफ द सिरीज – ओम पवार उदगीर,
मॅन ऑफ द मॅच चेतन माने नांदेड यांनी पारितोषिके पटकाविले. संयोजक मारोती भोसले ,उपाध्यक्ष सिद्घार्थ सुर्यवंशी ,सचिन शिवशेट्टे ,. नागनाथ गुट्टे यांनी परीश्राम घेतले. सुत्रसंचलन बालाजी भोसले यांनी केले.