बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी संस्कार शिबिराची गरज – प्रा.मारोती बुद्रुक पाटील.

बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी संस्कार शिबिराची गरज - प्रा.मारोती बुद्रुक पाटील.

अहमदपूर ( गोविंद काळे)

निर्व्यसनी संस्कार संपन्न समाज घडवण्यासाठी व बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी संस्कार शिबिराची गरज असून अशा शिबिरात पालकांनी आपल्या मुलांना पाठवून योग्य संस्कार करून घ्यावेत असे आवाहन प्रा. मारोती बुद्रूक पाटील यांनी केले.
ह.भ.प. भागवताचार्य कैलास महाराज मद्दे लिंगधाळकर यांनी आयोजित केलेल्या क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल येथील भव्य बाल संस्कार शिबिरामध्ये रोज व्याख्यान होत असुन त्याच व्याख्यानमालेतील सहाव्या दिवसाच्या व्याख्यान मालेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण व संताचे संस्कार या विषयावर प्रा मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.
पुढे बोलतांना प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगत असताना ते म्हणाले की संस्कार हा साधनेचाही विषय आहे.संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते.माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय,संस्कारीत, विकसीत होते व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण होतात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत,बलशाली राष्ट्र निर्माण होईल हाच एकमेव या शिबिराचा उद्देश आहे.
यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र सांगत असताना ते म्हणाले की मां जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत सांगून धर्म रक्षणासाठी स्त्रियावर होत असलेल्या अन्यायासाठी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रेरणा दिली, व त्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढा दिला.दिन,दलित,शोषित पिडीत आणि दुबळ्यांचे कष्टकरी शेतकऱ्यांचे रक्षण केले.अन्याय करणाऱ्यांना दंड दिला. केवळ मुस्लिमांनाच नाही तर आपल्यातील ही जे चुकीने आणि अनितिने वागणारे आहेत अशांना सुद्धा कठोर दंड महाराजांनी दिला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शुद्ध चारित्र्य मातृभक्ती देशभक्ती धर्म भक्ती या वा आशा अनेक गोष्टी त्यातुन शिकता येतात, त्यामुळे मुलांनी महापुरुषांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा महाराजांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा असे व्याख्यानातून सांगून मुलांना प्रेरणा दिली व ह.भ प.कैलास महाराज यांनी समाजाची बांधिलकी म्हणून स्वखर्चातून सुरू केलेल्या या बालसंस्कार शिबिराचे कौतुक केले.व अशी शिबिरे गावोगाव झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

About The Author