नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत म्हणून १ लक्ष ५६ हजार ५०० रुपयांचे धनादेश वाटप !
चाकुर( गोविंद काळे ) : तहसील कार्यालय चाकूर येथे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांना मदत म्हणून धनादेशाचे वाटप केले. तालुक्यातील ५ जनावरे वीज पडून दगावली होती.
यामध्ये शंकर बाबुराव आलट रा.बोत्री : ३२ हजार रुपये, इब्राहिम मेहबूब सय्यद रा.रोहिणा : ३७ हजार ५०० रुपये, विठ्ठल शेषेराव वणलगावे रा.शेळगाव : १२ हजार रुपये, सूर्यकांत विठ्ठलराव मायपल्ले रा.कवठाळी : ३७ हजार ५०० रुपये असे एकूण १ लक्ष ५६ हजार ५०० रुपयांचे धनादेश वाटप आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, अडचणीच्या काळात नेहमी तत्पर राहत त्यांना योग्यरित्या मदत करत आलो आहे. यापुढे देखील शेतकरी हिताचा विचार करत शेतकरी बांधवांच्या अडी-अडचणीच्या काळात नेहमीच सोबत राहील, असा विश्वास दिला. यावेळी धनादेश वाटप केलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, नूतन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नंदकुमार पवार, नूतन संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, अंगद पवार, संदीप शेटे, बिलाल पठाण आदी मान्यवर, ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.